मुंबई : मुंबईतल्या गोरेगाव नेस्को प्रदर्शन केंद्रात अकराव्या एडिशन डीएनए ऑटो शोचं आयोजन करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रदर्शनात चारचाकी तसंच विदेशी बनावटीच्या दुचाकी गाड्यांसोबतच, विंटेज कार, विविध प्रकारचं वाहनांचं साहित्यही ठेवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या ऑटो शोमध्ये मुंबईतल्या वीजेटीआय इंजीनियरींगच्या विद्यार्थ्यांनी  तयार केलेली कारही ठेवण्यात आली आहे. या प्रदर्शनात होंडा, हुंडाई, मारुती, नेक्सा, फॉक्स वॅगन, स्कोडा, इसुजू, टाटा मोटर्स अशा विख्यात ब्रँडच्या कंपन्यानी सहभाग घेतला आहे. 


विशेष म्हणजे या प्रदर्शनात डीएनए ऑटो शोचे प्रायोजक असलेल्या माय इको एनर्जी या कंपनीनं इन डिजल नावाचं नविन प्रकारचं इको फ्रेंडली इंधन बाजारात आणलं आहे.