विधानसभेत भास्कर जाधव कडाडलेत; म्हणाले, सरकारने मोठी संधी गमावली !
Bhaskar Jadhav : विरोधी पक्षाचे काही निलंबित आमदार सभागृहात आल्याने शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी यांना सभागृहात कसे घेतले, असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर सभागृहात गोंधळ निर्माण झाला.
मुंबई : Bhaskar Jadhav : सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी विरोधी पक्षाचे 12 आमदार निलंबित करण्यात आले होते. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने निलंबन रद्द केले होते. त्यानंतर भाजपचे आमदार विधानसभेत पोहोचले. काही आमदार सभागृहात आल्याने शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी यांना सभागृहात कसे घेतले, असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर सभागृहात गोंधळ निर्माण झाला. विधानसभा सभागृहात गोंधळ झाल्याने काही काळ सभागृह तहकूब करण्यात आले. (12 MLAs suspended : Bhaskar Jadhav asked questions to the government in the assembly)
निलंबित 12 आमदार प्रकरणी भास्कर जाधव यांनी अनेक प्रश्न सरकारला विचारलेत. यावेळी जाधव आक्रमक दिसून आले. सभागृहात जाधवांचा आवेश पाहाण्यासारखा होता. योगेश सागर यांना सभागृहात कसे घेतले, असे म्हणत त्यांनी सरकारवरच नाराजी व्यक्त केली.
संसदीय कामकाजात न्यायालयाचा हस्तक्षेप कशासाठी? या निर्णयामुळे उच्च न्यायालय, सत्र न्यायालय हे ही या निर्णयाच्या आधारे निकाल देऊ शकतात. त्यामुळे असे निर्णय आता मान्य करणार का? हा हस्तक्षेप नको हे सांगण्याची संधी गमवली महाराष्ट्र सरकारने गमावली आहे. या आमदारांना संसदीय समितीने निलंबित केले आहे. त्यामुळे त्यांना सभागृहात घेण्याबाबत तसा ठराव झालेला नाही. मग हे सभागृहात आलेच कसे, त्यांना सभागृहात घेतलेच कसे, असे प्रश्न उपस्थित केले. त्यांनंतर विधानसभा सभागृहात गोंधळ झाला. यामुळे दुपारी 12 वाजेपर्यंत सभागृह तहकूब करण्यात आले.