मुंबई : मुंबई मॅरेथॉनमुळे आज सारी मुंबई धावतीये....यंदा जवळपास ४४ हजार स्पर्धक सहभागी होतील असा दावा आयोजकांनी केला होता. मात्र १४ व्या मुंबई मॅरेथॉनकडे धावपटूंनी आणि सेलिब्रिटींनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळतय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशियातील सर्वात मोठी अशी ख्याती असलेल्या या मॅरेथॉनमध्ये व्यवसायिक धावपटूंबरोबरच हौशे नवशेही सहभागी झालेत.


सिनिअर सिटीझन मॅरेथॉन 


 मॅरेथॉनचं स्वरुप पाहिलं तर  ४२ किलोमीटरची फुल मॅरेथॉन, २१.०९७ किलोमीटरची हाफ मॅरेथॉन, ६ किलोमीटर ड्रिम रन, सिनिअर सिटीझन मॅरेथॉन ही ४.३ किलोमीटरची होती.


विविध गटात स्पर्धा  


 तर चॅम्पियन्स विथ डिसऍबिलिटी  ही मॅरथॉन २.४ किलोमीटरची आणि नव्यानं समावेश करण्यात आलेली १० किलोमीटर मॅरेथॉन अशा विविध गटात ही स्पर्धा पार पडतेय. 


दिव्यांगाचाही उत्साह


चौदाव्या मुंबई मॅरेथॉनमध्ये देशातील आणि परदेशातील स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत दिव्यांग आणि विशेष मुलांनीही सहभाग घेतला.


त्यांचा या स्पर्धेतील उत्साह कुणालाही लाजवेल असाच होता. या स्पर्धेत सहभागी होऊन या विशेष मुलांनी 'हम भी किसी से कम नहीं' असा संदेश दिलाय.