मुंबई : महाराष्ट्रात एकूण चार टप्प्यामध्ये निवडणूक होत आहेत. मुंबईत अखेरच्या म्हणजेच चौथ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. मुंबईत 29 एप्रिलला मतदान होणार आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणावर प्रचार सभा होत आहेत. मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार अर्ज भरण्याची प्रक्रिया 2 एप्रिल पासून सुरु झाली होती. तर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 9 एप्रिल होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील एकूण 6 लोकसभा मतदारसंघ आहेत. या 6 मतदारसंघातून तब्बल 156 इच्छूक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मुंबईतील उत्तर पूर्व मतदार संघातून सर्वाधिक अर्ज दाखल केले आहे. या मतदारसंघासाठी अधिकाअधिक उमेदवार इच्छुक असल्याचे समोर आले आहे. उत्तर-पूर्व मतदारसंघातून 33 जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहे. या मतदारसंघानंतर दक्षिण मध्य मतदारसंघातून सर्वाधिक 30 उमेदवार इच्छूक असून ते देखील आपले नशिब आजमवणार आहेत. 


मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघासाठी बहुंताश उमेदवारांनी सोमवारीच आपले अर्ज जमा केले. मुंबई उत्तर मतदारसंघातून 22, तर उत्तर-पश्चिम आणि उत्तर-मध्य मतदारसंघातून 27 आणि मुंबई दक्षिण मतदारसंघातून 17 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर आणि राष्ट्रवादीचे संजय दीना पाटील यांनी शेवटच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी 9 एप्रिलला अर्ज भरला. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 12 एप्रिल आहे.


मुंबईतील एकूण 527 मतदान केंद्रामधून तब्बल 2 हजार 601 मतदान केंद्राची सोय करण्यात आली आहे. ही निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर निकाल 23 मे रोजी स्पष्ट होणार आहे.