मुंबई : भेंडीबाजार परिसरात पाच मजली रहिवाशी इमारत कोसळून २४ जणांचा मृत्यू झालाय. या दुर्घटनेत ४ अग्निशमन दलाच्या जवानासह १२ जण जखमी झालेत तर ३० जणांना सुखरुप वाचवण्यात आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जखमींना जे.जे. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. जे. जे. फ्लायओव्हरजवळ पाकमोडिया स्ट्रीट इथं हुसैनी नावाची ११७ वर्ष जुनी इमारत सकाळी साडेआठच्या सुमारास कोसळली. या इमारतीमध्ये ३ कुटुंब राहत असल्याची माहिती समोर येतेय.


आरसीवाला कुटुंबासह अन्य २ कुटुंब इथं राहत होते. या कुटुंबांमध्ये एकूण २५ सदस्य राहत होते. त्याचसोबत इमारतीच्या तळमजल्यावर भटारखाना होता. तिथे १५-२० कर्मचारी काम करत होते. तसंच या ठिकाणी एक प्ले ग्रुपही आहे.


याठिकाणी सकाळी नऊच्या सुमारास लहान मुलं येतात. मात्र त्याआधीच ही इमारत कोसळल्यानं अनेक चिमुकल्यांचे जीव वाचलेत. दरम्यान अग्निशमन दलाचे जवान आणि एनडीआरएफची टीम मदत आणि बचावकार्यासाठी तात्काळ दाखल झालीय. ढिगा-याखाली आणखी काही जण अडकल्याची भिती व्यक्त होतेय.