मुंबई : राज्यात मंगळवारी कोरोनाच्या २०९१नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या ३६ हजार ४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल २२६८  रुग्ण बरे होवून घरी गेले असून आतापर्यंत १६ हजार ९५४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आत्तापर्यंतच्या एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५४ हजार ७५८ एवढी आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ९० हजार १७० नमुन्यांपैकी ५४ हजार ७५८जणांचे नमूने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ६७ हजार ६२२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५ हजार २०० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 



राज्यात ९७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद काल झाली असून एकूण संख्या १७९२ झाली आहे. मंगळावारी नोंद झालेल्या मृत्यूपैकी ३५ मृत्यू हे मागील दोन दिवसातील आहेत. तर उर्वरित दोन मृत्यू हे १७ एप्रिल ते २३ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ६२ मृत्यूपैकी मुंबईचे १९, ठाण्याचे १५, कल्याण-९डोंबीवलीचे ९, सोलापूरचे ६, मिरा-भाईंदरचे ५, उल्हासनगरचे ३, मालेगावमधील ३ तर पुण्यातील एक आणि औंरगाबादमधील १ मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये 3३९, पुण्यात ८, ठाणे शहरात १५, औरंगाबाद शहरात ५, सोलापूरात ७, कल्याण डोंबिवलीमध्ये १०, मीरा-भाईंदरमध्ये ५, मालेगाव आणि उल्हासनगर मध्ये प्रत्येकी३, नागपूर शहरात १, रत्नागिरीमध्ये १ मृत्यू झाला आहे.



राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या २५६२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १६,७८० सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६५.९१ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.