आज जरी मायानगरी मुंबईचं नाव आलं तरी लोकांच्या डोळ्यासमोर मोकळा श्वास घेणारी आणि चित्रपटसृष्टीत आपली भविष्य आजमवण्यासाठी येणारी तरुण मंडळी...म्हणतात मुंबईत कोणीही उपाशी झोपत नाही. इथे हाताला सहज काम मिळतं. त्यामुळे आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजही इथे असंख्य लोक कानाकोपऱ्यातून येतात. या झगमगत्या दुनियेचा भाग होण्यासाठी मुंबईत आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. ( 18 yr old girl came to Mumbai to act in a film and became a victim of the casting directors physically assaulting)


मुंबई हादरली!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीडित तरुणी गुजरातमधील असून ती व्हिडीओचे रील बनवून सोशल मीडियावर पोस्ट करायची. अल्पवयीन मुलाला चित्रपटात काम करण्याची आवड होती. मुलींच्या काकांनी तिची इच्छा पाहून तिची 13 डिसेंबरला साजिद खानशी भेट करुन दिली. काकांना वाटलं की, साजिद मुलीला अभिनय शिकवेल आणि तिला चित्रपटात काम मिळवून देण्यात मदत करेल, अशी आशा होती. पीडितेच्या कुटुंबीयांचा साजिदवर विश्वास होता, त्याचा फायदा घेत साजिदने पीडितेला 24 डिसेंबरला मायानगरी मुंबईत घेऊन आला. मुंबईतील अंधेरीमधील हॉटेलमध्ये तिला नेलं. त्यानंतर 25 डिसेंबरला ख्रिसमसच्या दिवशी साजिदने तरुणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. 


तरुणीने कसंबसं त्या नराधमापासून सुटका केली आणि पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेनंतर घाबरलेली तरुणी खोलीतून पळत सुटली आणि पोलिसांकडे जाऊन तिने तक्रार दाखल केली. तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी साजिद खानला त्याच्या हॉटेल रूममधून अटक केली. आज पोलीस साजिदला न्यायालयात हजर करून पुढील तपास करणार आहेत. 


पोलीस अनेक बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आरोपी अल्पवयीन पीडितेला गुजरातमधून मुंबईत कसे घेऊन आला, याचाही शोध पोलीस घेत आहेत. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा बारकाईने तपास असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.  


दरम्यान स्वत:ला गुजराती चित्रपटांचा दिग्दर्शक म्हणवून घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्या नराधमाला गजाआड केलंय.  साजिदवर अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असून, त्याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी माहिती दिली आहे.