मुंबई : मुंबईत १२ मार्च १९९३ ला झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातील शेवटचे ७ आरोपी दोषी आहेत की नाहीत? याचा फैसला विशेष टाडा न्यायालय आज देणार आहे. या आरोपींमध्ये गँगस्टर अबू सालेमचाही समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सात आरोपींमध्ये पोर्तुगाल देशातून प्रत्यार्पण करून आणलेला माफिया डॉन अबू सलेम, दुबईहून अटक केलेला मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहेर मर्चंट, रियाझ सिद्धक्की, करीमुल्ला शेख आणि अब्दूल क्युम शेख यांचा समावेश आहे. २००५ मध्ये सुरू झालेल्या या ट्रायलचा जवळपास १२ वर्षांनंतर निर्णय येणार आहे.


२५७ जणांचा मृत्यू


मुंबईतल्या या साखळी बॉम्बस्फोटात २५७ जणांचा मृत्यू झाला होता. या खटल्यात एकूण १२९ आरोपी होते. त्यापैकी १०० आरोपींना टाडा न्यायालयानं दोषी ठरवून ६ महिने ते मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. मुख्य सुत्रधार याकूब मेमनला फाशीची शिक्षा देण्यात आलीय. तर दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, अनिस इब्राहिमसह एकूण २७ आरोपी अजून फरार आहेत.


१९९३ चा बॉम्बस्फोट


दुपारी १.३० वाजता - मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये स्फोट


दुपारी २.१५ वाजता - नरसी नाथ रोडवर स्फोट


दुपारी २.३० वाजता - शिवसेना भवनाजवळ तिसरा स्फोट


दुपारी २.३३ वाजता - एअर इंडियाच्या इमारतीजवळ स्फोट


दुपारी २.४५ वाजता - सेन्चुरी बाजारात स्फोट


दुपारी २.४५ वाजता - माहीममध्ये स्फोट


दुपारी ३.०५ वाजता - झवेरी बाजारात स्फोट


दुपारी ३.१० वाजता - सी रॉक हॉटेलमध्ये स्फोट


दुपारी ३.१३ वाजता - प्लाझा सिनेमाजवळ स्फोट


दुपारी ३.२० वाजता - जुहू सेंटर हॉटेलमध्ये दहावा स्फोट


दुपारी ३.३० वाजता - सहार एअरपोर्टजवळ स्फोट


दुपारी ३.४० वाजता - एअरपोर्ट सेंटर हॉटेलमध्ये बारावा स्फोट