मुंबई :  राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून विविध जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार (Maharashtra Rain Forcast) हजेरी लावलीय. पावसामुळे काही ठिकाणी शेतपिकांचं नुकसानही झालंय. त्यातच आता पावसाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. हवामान विभागाने (Imd) पावसाबाबत इशारा दिला आहे. मुंबईसह (Mumbai Rain Update) उपनगराला 2 दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच इतर जिल्ह्यांनाही अलर्ट जारी करण्यात आला आहे. (2 days of heavy rain in suburbs including mumbai meteorological department forecast)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई शहरासह उपनगरात तब्बल 2 दिवस मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईला यलो अलर्ट जारी केला आहे. तर पालघर, रायगड आणि ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला गेलाय. तसेच विदर्भातही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.


या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट


हवामान विभागाकडून सातारा,कोल्हापूर, रत्नागिरी आणि नाशिकला ऑरेंज अलर्ट  देण्यात आला आहे. तर पालघर जिल्ह्याला पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट असणार आहे.