Mumbai Crime News : सरकारी नोकरी मिळावी असे प्रत्येकालाच वाटत असत. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणारे पैसे देखील तयार होतात. मत्रालयात असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. थेट मंत्रालयात (Mantralaya) नोकरीची मुलखात झाली. कुणाला हे सगळं खोट वाटले. मात्र, 20 लाख बुडाल्यावर सत्य समोर आलं. मंत्रायलात नोकरी लावण्याच्या नावाने फसवणुक करण्यात आली आहे.  


मंत्रालयात नोकरी लावण्याचं आमिष दाखवत असेल तर सावधान!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्रालयात जर कोणी नोकरी लावण्याचं आमिष दाखवत असेल तर त्याला बळी पडू नका. कारण मंत्रालयात पुन्हा एकदा बोगस भरती करणारं रॅकेट उघडकीस आलंय. नोकरी मिळवून देण्याच्या नावाने चौघांच्या टोळीनं 20 लाख रुपये उकळले आहेत.


असा घातला गंडा


मंत्रालयात नोकरी मिळवून देण्यासाठी बोगस मुलाखती घेण्यात आल्या. बनावट मेडिकल सर्टिफिकेटही दिले. त्यानंतर उपसचिव दर्जाच्या अधिका-याच्या सहीचं बोगस नियुक्ती पत्रही देण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी मंत्रालयातल्या दोघांसह एकूण चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. 


मंत्रालयातील कर्मचारीच घालत होते गंडा


मंत्रालयातील कर्मचारीच गंडा घालत होते. यातला बापूराव जाधव हा मंत्रालयात कर्मचारी आहे. तर सचिन डोळस हा शिपाई आहे.. तर नितीन साठे हा सामान्य प्रशासन विभागात सचिव पदावर असल्याचं सांगत त्याच्या केबिनमध्ये मुलाखती घेण्यात आल्यात.  सचिन डोळस आणि नितीन साठेवर याआधीही बोगस भरतीप्रकरणातच गुन्हा दाखल आहे.


मंत्रालयात काम करणारा शिपाईच करत होता  लिपीक पदासाठी बोगस भरती


मंत्रालयात शिपायाकडूनच बोगस लिपीक पदाच्या भरतीचं रॅकेट चालवलं जात असल्याचं उघड झाले होते. मंत्रालयात  लिपीक पदासाठी बोगस भरती सुरू होती. त्यासाठी उमेदवारांकडून 6 ते 10 लाख रूपये उकळण्यात आले. या रॅकेटमध्ये 10 जणांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली होची. त्यांच्याकडून जवळपास 60 लाख रूपये उकळण्यात आले होते. लिपिक पदासाठी मंत्रालयातच त्यांच्या बोगस मुलाखती घेण्यात आल्या होत्या. तर जेजे रूग्णालयात मेडिकलही घेण्यात आली. पोलिसांनी 4 जणांविरोधात गुन्हा नोंदवला होता. महेंद्र सकपाळ, महादेव शिरवाळे, सचिन डोळस, नितीन साठे अशी चौकडीची नावं आहेत. यातील महेंद्र सकपाळ हा शिपाई आहे तर नितीन साठे हा सामान्य प्रशासन विभागात सचिव पदावर असल्याचं सांगत त्याच्या केबिनमध्ये मुलाखतीही पार पडल्या. लवकरच विभागप्रमुखांची सही घेऊन अपॉईंटमेंट लेटर, आय कार्ड आणि कीट देणार असल्याचं सांगण्यात आले होते. मात्र, नोकरी न लागल्याने या रॅकेटचा गौप्यस्फोट झाला होता.