अंगावरुन गाडीचे तीन डबे गेल्यानंतरही `ती` वाचली
अंधेरी स्टेशनवर २२ वर्षांच्या क्षितीजा सुर्यवंशी या तरूणीने गाडीखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडीचे ३ डबे अंगावरून गेले तरीही क्षितीजाचे प्राण वाचले. क्षितीजा गाडी आणि रूळांखालचे स्लीपरर्स यातल्या मधल्या फटीत अडकल्याने सुरक्षित राहीली.
मुंबई : अंधेरी स्टेशनवर २२ वर्षांच्या क्षितीजा सुर्यवंशी या तरूणीने गाडीखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडीचे ३ डबे अंगावरून गेले तरीही क्षितीजाचे प्राण वाचले. क्षितीजा गाडी आणि रूळांखालचे स्लीपरर्स यातल्या मधल्या फटीत अडकल्याने सुरक्षित राहीली.
या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झालंय. क्षितीजा आधी प्लॅटफॉर्मवर उभी राहून कोणाशी तरी फोनवर बोलत होती. त्यानंतर काही वेळाने कॉल कट करून तिने तीने येणाऱ्या गाडीखाली उडी मारली.
क्षितीजा रोज संध्याकाळी साडेपाच वाजता क्लासला जाण्यासाठी अंधेरीहून विलेपार्ल्याला जाण्यासाठी गाडी पकडते. या घटनेनंतर क्षितीजावर कूपर रूग्णालयात उपचार करण्यात आलेत. काही दिवसांपूर्वी अशीच घटना कुर्ला रेल्वे स्थानकात घडली होती. कानात हेडफोन घालून फोनवर बोलत रूळांच्या मधून जाणारी प्रतिक्षा मयेकर नावाची तरूणी गा़डीखाली आली. पण गाडीखाली येऊनही ती वाचली होती.