मुंबई : मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तिसरं धरण भरले आहे. मोडकसागर धरण ५.२० मिनिटांनी भरले आहे. तुलसी, तानसानंतर मोडकसागरही धरण भरले आहे. मुंबईला दररोज ४५० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मुंबईला प्रमुख सात तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. या सात धरणांची पाणी साठवणूक क्षमता एकूण साडेचौदा दशलक्ष लीटर आहे.


मोडकसागर धरण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोडकसागरची क्षमता १२ लाख ८९ हजार दशलक्ष लीटर आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातपैकी तीन धरणं भरली आहेत. 


तानसा धरण


गुरुवारी दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी तानसा धरण ओव्हरफ्लो झालं.  तानसा धरणाची क्षमता १२८.६२ मीटर टीएचडी इतकी आहे. धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरण पूर्णपणे भरलं आहे. गेल्यावर्षी तानसा धरण १७ जुलै रोजी सायंकाळी ६.१५ वाजता ओसंडून वाहू लागले होते.


तुळशी धरण


मुंबईला पाणीपुरवठा करणारा आणखी एक महत्त्वाचा धरण म्हणजे तुळशी. या तलावाची पाणी क्षमता १३९.१७ मीटर इतकी आहे. १२ जुलैलाच हा तलाव पूर्णपणे भरला आहे. त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता कमी झाली आहे.


तलावातील पाणीसाठा क्षमता 


मोडकसागर- १२८९२५
तानसा- १४५०८०
विहार- २७६९८
तुलसी- ८०४६
अप्पर वैतरणा- २२७०४७
भातसा- ७१०३७
मध्य वैतरणा- १९३५३०