मुंबई : मुंबईमध्ये पावसाचा पहिला बळी गेला आहे. आदियान परवेझ तांबोळी या तीन वर्षीय मुलाचा ड्रेनेजमध्ये पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. चिता कँप परिसरातील १२ वाजण्याच्या सुमारास ही दुर्देवी घटना  घडली. पावसाच्या पाण्याने ड्रेनेज ओव्हरफ्लो झाले होते. या ओव्हरफ्लो झालेल्या पाण्याचा अंदाज येणं शक्य नसल्याने आदियान यामध्ये पडला. त्याला गोवंडीच्या शताब्दी रूग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पालिकेने गटारी साफ न केल्यामुळं त्या तुंबत असल्याचा स्थानिक एमआयएम नगरसेवक शहानवाझ शेख यांनी दावा केला आहे. मुलाच्या मृत्यूस पालिका प्रशासन कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.