मुंबई : दिपावली सुट्टीच्‍या दरम्‍यान होणा-या अतिरिक्त गर्दी बघता रेल्‍वेने छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस–कोचुवेली च्‍या दरम्‍यान विशेष गाड्या चालविण्‍याचा निर्णय घेतलाय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

०१०७९ विशेष गाडी १७ ऑक्टोबर आणि २४ ऑक्टोबरला(२ फेऱ्या) प्रत्येक मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन रात्री बारा वाजून २० मिनिटांनी निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता कोचुवेलीला पोहोचेल. ०१०८० ही विशेष गाडी १८ ऑक्टोबर आणि २५ ऑक्टोबर(दोन फेऱ्या) प्रत्येक बुधवारी कोचुवेलीहून दुपारी १२ वाजता निघून दुसऱ्या दिवशी २२.१५ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. 


ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर रोड, रत्‍नागिरी, कणकवली, कुडाल, थि‍वीम, करमाळी, मडगांव जक्‍शन, कारवार, कुमटा, भटकल, कुंदापुरा, उडुपी, मुलकी, सुरतकल, मंगळुरू जंक्‍शन, कासारगोड, कन्‍नुर, थलाशेरी, कोयीकोडे, तिरूर, शोरनुर जक्‍शन, त्रिसुर, अलुवा, एर्नाकुलम टाऊन, कोट्टययम, तिरूवल्‍ला, चेनगानुर, कायांकुलम आणि कोल्लम या स्थानकांवर थांबेल. या गाड्यांचे अनारक्षित डब्बे आणि अनारक्षित विशेष करीत तिकीट यू टी एस च्‍या माध्यमातून करू शकता.