मुंबई : धारावीत आज कोरोनाचे ४२ रूग्ण वाढले आहेत. धारावीत कोरोना रूग्णांची संख्या ६३२ वर पोहोचली आहे. धारावीत मागील दोन दिवसांच्या तुलनेत आज रूग्णांची संख्या घटली असली तरी ४२ ही संख्या काही कमी नाही. तसेच दादरमध्ये ४ आणि माहिममध्ये ही ३ कोरोनाचे रूग्ण वाढले आहेत. दादरमध्ये एकूण रूग्णसंख्या ५४ तर माहिममध्ये ७१ झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत रविवारी कोरोनाचे ४४१ नवे रुग्ण वाढले होते. ज्यामध्ये धारावीतील रुग्णांची संख्या ९४ होती. चिंतेंची गोष्ट म्हणजे धारावीत कोरोनाच्या रुग्णांमध्ये तरुणांची संख्या जास्त आहे.


आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ज्याची ओळख आहे. त्या धारावीत जवळपास १५ लाख लोकं राहतात. धारावीत कोरोनाचा संसर्ग वाढल्यास प्रशासनाची चिंता आणखी वाढणार आहे. धारावी कोरोनाचं हॉटस्पॉट बनला आहे. पण येथे लोकांकडून अजूनही लॉकडाऊनचं पालन होताना दिसत नाहीये.