मुंबई : बचत करण्यासाठी नेमकं काय करावं? हा साऱ्यांनाच पडलेला प्रश्न.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भविष्याचा विचार करून कायम गुंतवणूक केली जाते. पण या गुंतवणूकीत फक्त भविष्याचा विचार नसता आपत्तीजनक परिस्थिती आल्यास नेमकं काय करावं याचा देखील विचार करून तुम्ही गुंतवणूक करू शकता. 


प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना :


या योजनेचा वार्षिक प्रिमियम कर वगळता १२ रुपये एवढाच आहे. ही एक शासनाची विमा योजना आहे. ही योजना १८ ते ७० वर्षे वयोगटांतील सर्व भारतीय नागरिकांसाठी खुली आहे. या विमा योजनेत अपघाती मृत्यू ओढावल्यास किंवा पूर्णत: अपंगत्व आल्यास  २ लाख रुपये मिळतील. तसेच अंशतः १ लाख रुपये मिळतात. सर्व बँकखाते धारकांना त्यांच्या नेटबँकिंग सेवांमार्फत या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. या योजनेची १ वर्षाची सुरक्षा १ जून ते ३१ मे अशी असेल. त्यामुळे यामध्ये याचा फायदा करून घेऊ शकता. 


प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना


या योजनेत २ लाख रुपयांचा आयुर्विमा मिळतो. दरवर्षी ३३० रुपये किंवा दरमहा  २७.५० रुपये एवढा कमी प्रिमियम भरावी लागणारी ही आयुर्विमा योजना १८ ते ५० वर्षे वयोगटातील लोकांसाठी आहे.  या योजनेचा लाभही नेटबँकिंग मार्फत घेता येऊ शकतो आणि ही रक्कम तुमच्या खात्यामधून आपोआप डेबिट होते. विमा असलेल्या व्यक्तीचे वय ५५ वर्षे झाले, की योजना संपुष्टात येते.


पब्लिक प्रोव्हिडंट फंड 


यामध्ये पीपीएफ खाते १०० रूपयाच्या किमान गुंतवणुकीसह उघडू शकता, आणि दरवर्षी ५०० ते १.५ ला रुपयांपर्यंतच्या गुंतवणुका त्यामध्ये करू शकता. परंतु, जर तुम्ही या फंडामध्ये दर आर्थिक वर्षाला १.५ लाखांहून जास्त गुंतवणूक केलीत, तर अतिरिक्त गुंतवणुकीवर कोणतेही व्याज मिळणार नाही. पीपीएफवरील व्याजदर शासनाद्वारे दर तिमाहीत ठरवला जातो. सध्या, पीपीएफचा दर ७.८ टक्के निश्चित केलेला आहे, जो दर वर्षी चक्रवाढीने गणला जातो.प्राप्तिकराच्या कलम ८०क अंतर्गत, पीपीएफमधील १.५ लाखांपर्यंतची वार्षिक योगदाने कर सवलतीस पात्र असतात.


इक्विटी म्युच्युअल फंड एसआयपी 


एसआयपी गुंतवणुका दीर्घ कालासाठी सुरक्षित आहे. यामध्ये तुम्ही लाँग टर्म बेसवर गुंतवणूक करू शकता. पण यासोबत  तुमचा वृद्धपकाळही सुरक्षित करता येतो. यासाठी तुम्हाला केवळ एका प्रतिष्ठित म्युच्युअल फंड हाउसमध्ये नोंदणी करण्याची गरज आहे. त्यामुळे याची पुरेपर माहिती घेऊन गुंतवणूक करा. 


अटल पेन्शन योजना 


ही योजना तुम्हाला वयाच्या ६० व्या वर्षी अधिक लाभ देईल. ही योजना पेन्शन योजना असल्यामुळे यामध्ये सुरूवातीला गुंतवणूक करून नंतर याचा लाभ घेऊ शकता.  तुमच्या योगदानानुसार आणि मुदतीनुसार ठरावीक रक्कम पेन्शन म्हणून मिळू लागेल. तुम्ही या योजनेमध्ये वयाच्या १८ व्या वर्षीपासून गुंतवण्यास सुरुवात करू शकता आणि वयाच्या ६०व्या वर्षीपर्यंत पैसे गुंतवू शकता. या योजनेचे मासिक योगदान दरमहा  केवळ ४२ रुपये इतकेच देणे आवश्यक आहे. तुम्हाला मुदतीच्या अखेरीस पेन्शनची रक्कम म्हणून रु १००० मिळतील.