मुंबई : Mumbai Municipal Corporation Recruitment : मुंबई महापालिकेत 2019 पासूनची नोकर भरतीवरील बंदी लवकरच उठणार आहे. त्यामुळे लवकरच मुंबई महापालिकेत 5 हजार पदांची भरती होणार असल्याचा दावा कामगार संघटनांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कामगार संघटना आणि पालिका आयुक्तांची बैठक झाली. या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. प्रशासनाने नोकर भरतीवरील बंदी उठवण्यात येणार असल्याचं स्पष्ट केले आहे. पण, नेमक्या किती जागा भरल्या जाणार याचा निर्णय पालिका आयुक्त घेणार आहेत.


गेल्या तीन वर्षांत पालिकेत भरती झालेली नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेत सुमारे 30 ते 40 हजार पदे रिक्त असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेची आर्थिक परिस्थिती खराब झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आर्थिक स्थितीत सुधारणा होईपर्यंत नोकर भरती थांबवण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला होता. या निर्णयाचे पडसाद  याआधी मुंबई पालिकेच्या स्थायी समितीत उमटले होते.



यावेळी नोकरी भरती बंद करण्यापेक्षा सल्लागार, ओएसडीवर आणि इतर कामांवरील अनावश्यक खर्च कमी करा, असे सांगत सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिका प्रशासनाला फैलावर घेतले होते. याबाबतची सविस्तर माहिती मिळेपर्यंत भरती रोखण्याचा प्रस्ताव मागे घेण्यास तत्कालीन अध्यक्ष यशवंत जाधव यांनी स्थगिती दिली होती.


अशी होणार होती भरती


मुंबई महापालिकेत कार्यकारी सहाय्यक वर्गाची (लिपिक) एकूण 5255 पदे आहेत. त्या पदांपैकी सरळसेवा पध्दतीने 3221 पदे भरायची आहेत. त्यातील सरळसेवेपैकी रिक्त असलेली 810 पदे भरण्यात येणार आहे. महापालिकेकडून याबाबतची ऑनलाईन परीक्षा घेवून भरती प्रक्रीया राबवली जाणार होती. ही पदे भरण्यासाठी महापालिकेने कंपनीची निवड केली होती. मात्र, भरती झालेली नाही.