मुंबई : मुंबईतील कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. फक्त मुंबईत कोविड-१९ मुळे मार्च महिन्यात ९ रूग्णांचा मृत्यू झाला होता. पण एप्रिल महिन्यात यामध्ये ४०% वाढ झाली असून हा आकडा २८१ पर्यंत पोहोचला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्च महिन्यात ९२ कोरोना व्हायरसचे रूग्ण आढळले असून त्यापैकी ९ जणांचा मृत्यू झाला. तर एप्रिल महिन्यात हा आकडा २८१ पर्यंत पोहोचला. एप्रिल महिन्यात ६९१० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मे महिन्याच्या पहिल्या चार दिवसांतच मुंबईत ७१ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आता ३६१ वर पोहोचला आहे. मुंबईत पहिली केस ही ११ मार्च रोजी सापडली. 


मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत ९२ हा कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा होता. मात्र एप्रिल महिन्याच्या सात तारखेपर्यंत यामध्ये झपाट्याने वाढ झाली. एका दिवसांत जवळपास १०० नवे कोरोनाबाधित रूग्णांची नोंद होत होती. एप्रिल महिन्याच्या अखेरीपर्यंत मुंबईत ६९१० कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली. यामध्ये २८१ लोकांचा मृत्यू झाला. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या आकड्यात ५०% ने वाढ झाली. 


मुंबई, पुणे आणि ठाणे जिल्ह्यात राज्याच्या तुलनेत ८८% कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. उरलेल्या २४ जिल्ह्यांमध्ये राज्याच्या तुलने २/३ असा कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा आहे. तज्ज्ञांनी आगामी काळात आणखी कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागेल अशी भीती व्यक्त केली आहे. मे आणि जून महिन्यापर्यंत हा आकडा वाढू शकतो असं केईएमचे माजी डिन डॉ. अविनाश सुपे यांनी म्हणाले आहे. मे महिन्यात आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.