मुंबई : महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात आज कोरोनाचे (Coronavirus) ११,०६० रुग्ण ठणठणीत बरे झालेत. राज्यात आजपर्यंत एकूण १५,६२,३४२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Corona Recovery Rate) ९१.३५ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ५,०२७ नवीन रुग्णांचे निदान झाले, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात आज १६१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९३,१८,५४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,१०,३१४ (१८.३५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १०,५९,४९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ८,८७९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात काल  ५२४६ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले होते. 



आज राज्यात ५,०२७ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १७,१०,३१४ झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण १६१ मृत्यूंपैकी ७३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ५१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५१ मृत्यू  सातारा -१३  पुणे – ११, सोलापूर -५, नांदेड ५, ठाणे -४, गोंदिया -४, अहमदनगर -२, बुलढाणा -२, नाशिक -२, जळगाव -१, कोल्हापूर -१आणि सांगली -१ असे आहेत.  पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.