मुंबईतील ६ नगरसेवकांची जात प्रमाणपत्रे रद्द, आणखी काही नगरसेवकांवर आज निकाल
मुंबई महापालिकेच्या ६ नगरसेवकांची जात प्रमाणपत्रे रद्दबादल झाली आहेत. मंगळवारीही आणखी काही नगरसेवकांचे भवितव्य ठरणार आहे.
मुंबई : मुंबई महापालिकेच्या ६ नगरसेवकांची जात प्रमाणपत्रे रद्दबादल झाली आहेत. मंगळवारीही आणखी काही नगरसेवकांचे भवितव्य ठरणार आहे.
भाजपचे पती आणि पत्नी नगरसेवकांचे जात प्रमाणपत्र रद्द झाले आहे. प्रभाग क्रमांक ८१ चे मुरजी पटेल आणि प्रभाग ७६ च्या केशरबेन मुरजी पटेल यांचं जात प्रमाणपत्र रद्द झालं आहे. येथे दोन्ही जागेवर २ नंबरवर शिवसेनेचे उमेदवार आहेत.
काँग्रेसचे प्रभाग २८ चे राजपती यादव आणि प्रभाग ६२ चे अपक्ष नगरसेवक चंगेज मुलतानी यांचेही जात प्रमाणपत्र रद्द झाले आहे. प्रभाग ३२ च्या काँग्रेस नगरसेविका स्टेफी मॉरस्केनी यांचे ओबीसी जात प्रमाणपत्र रद्द झाले आहे. येथून दोन नंबरवर असलेल्या शिवसेनेच्या उमेदवार गिता किरण भंडारींना नगरसेवकपदाची संधी मिळणार आहे.
प्रभाग ७२ मधून भाजपचे नगरसेवक पंकज यादव यांचेही ओबीसी जात प्रमाणपत्र रद्द झाले आहे. येथून दुस-या क्रमांकावरील शिवसेनेचे अनिल मानेंना नगरसेवकपदाची संधी मिळणार आहे.