Mumbai Mega Block Latest News: ठाणे स्थानकातील 63 तासांचा ब्लॉक आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील 36 तासांचा ब्लॉक आजपासून सुरू झाला आहे. या मेगाब्लॉकमुळं तब्बल 33 लाख प्रवाशांना फटका बसणार आहे. नोकरदरा वर्गाचे प्रचंड हाल होत आहेत. तीन दिवसांत तब्बल 930 लोकल रद्द करण्यात आल्याने नागरिकांचा अर्धा तासांचा प्रवास एक तासावर गेला आहे. ठाणे, डोंबिवली स्थानकात प्रवाशांची गर्दी उसळली आहे. या जम्बो ब्लॉकमुळं एक ट्रेन 20 मिनिटांनी धावत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईकडे येणाऱ्या धीम्या मार्गावरील गाड्या डोंबिवली ते दिवा दरम्यान उभ्या करुन ठेवण्यात आल्या आहेत. डोंबिवली ते ठाणे दरम्यान प्रवासाला एक तास लागत आहे. तर, जलद मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्याची घोषणाही मध्य रेल्वेकडून करण्यात येत होती. मात्र, काही वेळाने जलद मार्गावरुन फास्ट लोकल सोडण्यात आल्या. असं असलं तरी धीमी वाहतूक प्रचंड उशीरा आहे. जम्बो ब्लॉकमुळं एक ट्रेन तब्बल 20 मिनिटांनी धावत आहे. ठाणे आणि डोंबिवली स्थानकात ट्रेन उशिरा असल्याने प्रवाशांची मोठी गर्दी उसळली आहे. 


दरम्यान, डोंबिवलीवरुन ठाण्याला पोहोचण्यासाठी 25 मिनिटे लागतात. मात्र, या ब्लॉकमुळं प्रवाशांना डोंबिवलीहून ठाण्याला पोहोचायला अर्धा तास जास्त लागला. म्हणजेच डोंबिवली-ठाणे प्रवासाला तब्बल 50 मिनिटे लागले आहेत. त्यामुळं प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. 


मुंबईसाठी पुणे एसटी विभागाकडून जादा गाड्या


मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरील फलाटांच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द झाल्या आहेत. पुण्याहून मुंबईकडे जाण्यासाठी 40 जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. मुंबईसाठी पुणे स्टेशन येथून 40 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. 


आजपासून ठाण्यात ब्लॉक (डाउन जलद)
स्थानक - कळवा ते ठाणे
मार्ग - अप-डाउन धीमा आणि अप जलद
वेळ - ३१ मे मध्यरात्री १२.३० ते २ जून दुपारी ३.३०


परिणाम - डाउन जलद मार्गावरील लोकल/मेल/एक्स्प्रेस पर्यायी मार्गावरून सीएसएमटीपर्यंत चालवण्यात येणार आहेत.