मुंबई : कोरोनाची लागण दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत १०१ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईत कोरोनाचा चौथा बळी गेला आहे. ६४ व्यक्तीचा यामध्ये मृत्यू झाला आहे. यूएईवरून मुंबईत ही व्यक्ती आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने संचारबंदीचा निर्णय घेतला. पण लोकं या निर्णयाचे तीन तेरा वाजवताना दिसत आहे. अद्याप नागरिकांना या कोरोनाची दाहकता लक्षात येत नाही, ही खंत सगळ्यांकडूनच व्यक्त केली जात आहे.  आतापर्यंत देशभरात दहा जणांचा बळी गेला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येने राज्यात शंभरचा आकडा गाठला आहे. राज्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ही १०१ वर पोहोचली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे राज्यात तीन लोकांनी आपला जीव गमावला आहे. तसेच समाधानकारक बाब म्हणजे मुंबईतील कोरोनाग्रस्त असलेल्या १२ रूग्णांची तपासणी केली आहे. महत्वाची बाब म्हणजे या रूग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून हे रूग्ण ठणठणीत बरे झाल्याची माहिती मिळत आहे. 


महत्वाची बाब म्हणजे ३१ मार्चपर्यंत सरकारने संचारबंदी आणली आहे. पण नागरिक याकडे पाठ फिरवताना दिसत आहे. सोमवारी आणि मंगळवारी सकाळी नागरिक आपल्या खासगी वाहनांसोबत रस्त्यावर उतरलेले दिसले. एवढंच नव्हे तर मुंबई आणि पुणे भाजी मार्केटमध्ये सर्रास फिरताना दिसत आहेत.