७ वर्षीय मुलीवर अत्याचार आणि हत्या
आईस्क्रीमचं आमिष दाखवून अत्याचार
ठाणे : देशभरात मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढत असताना ठाण्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. ठाण्यात ७ वर्षीय मुलीवर अत्याचारकरून तिची दगडाने ठेचून निर्घूण हत्या करण्यात आली. या प्रकराणी पोलिसांनी १० तासांच्या आता ३२ वर्षीय नराधमाला बेड्या ठोकल्यात. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
हा नराधम पीडित मुलीच्या घरी असलेल्या खानावळीमध्ये जेवायला येत असे. त्यामुळे ती चिमुकली त्याला ओळखत होती. याचाच गैरफायदा घेत आईस्क्रीमचं आमिष दाखवून त्यानं तिच्यावर अत्याचार केले आणि नंतर गळा दाबून तिची हत्या केली.
घडला प्रकार मुलगी सर्वांना सांगेल त्यामुळे प्रथम पीडित मुलीचा गळा दाबून हत्या करण्यात आली, त्यानंतर ओळख पटू नये म्हणून तिचा चेहरा दगडाने ठेचण्यात आला.
या प्रकरणी भिवंडी पोलिसांनी काही तासांतच नराधमाला ताब्यात घेतलं त्याचबरोबर सोमवारी त्या नराधमाला न्यायालयात हजर करण्यात आल्याचं वक्तव्य पोलिसांनी केलं आहे.
मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न वाऱ्यावर असल्याचे चित्र समोर येत आहे.