मतदान करून लग्नाचा ६० वा वाढदिवस साजरा
मतदानावर पावसाचं सावट
मुंबई : विधानसभेकरता मतदानाला 7 वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. सकाळपासूनच रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे मतदाराला भिजत मतदानाला जावे लागणार आहे. असं असताना वरळी येथे जांभोरी मतदान केंद्रात मात्र एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. या मतदारकेंद्रात 83 वर्षांच्या आज्जी आजोबा पहिला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांच्या लग्नाचा ६० वा वाढदिवस आहे. दिवसाची सुरुवात मतदान करुन लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याचं आजी आजोबांनी ठरवलं आहे.
आजींचा ६० वा लग्नाचा वाढदिवस असून त्यांच 42 वे मतदान आहे. आजी काठापदराची साडी नेसून आणि नथ घालून सुंदर तयार होऊन मतदानाकरता आल्या होत्या. लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी आजी आजोबा उत्साहात दिसत होते. मतदान केंद्र उघडलं नसतानाही लवकर हे दाम्पत्य मतदान केंद्रावर उपस्थित राहिले आणि आपल्या दिवसाची सुरूवात केली.
राज्यात पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर करून मतदान होणार आहे. यामुळे आजी-आजोबांचा उत्साह वाखाण्याजोगा होता. शनिवार-रविवारला लागूनच सोमवारी विधानसभेचं मतदान असल्यामुळे सकाळी मतदारांचा कमी उत्साह पाहायला मिळाला. त्यातच रिमझिम पावसामुळे सगळीकडे चिखल झाला आहे. मतदान केंद्र मैदानावर असल्यामुळे अनेकांना मतदान करायला जायला त्रास होत आहे.