मुंबई : धारावीत कोरोनामुळं दोघांचा मृत्यू तर २५ नवे रूग्ण वाढले. धारावीत एकूण कोरोना रूग्णांची संख्या पोहचली ८५९ वर आणि एकूण मृत्यूंची संख्या २९ वर पोहोचली आहे. आतापर्यंत २२२ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. दादरमध्येही एकाचा कोरोनामुळं मृत्यू झाला असून ४ नवे रूग्ण वाढलेत. दादरमधील एकूण रूग्ण संख्या १०९ तर एकूण मृत्यू ६ आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माहिममध्ये आज २ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ७ नवे रूग्ण आढळलेत. माहिममध्ये एकूण रूग्णसंख्या ११९ आणि एकूण मृत्यू ७ जणांचा झाला आहे. कोरोनातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या धारावीतील पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांना साधारण महिनाभरापूर्वी COVID-19 टेस्ट नेगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. या सर्वांना १४ दिवस रुग्णालयात राहून व्यवस्थित उपचार घेतले होते. मात्र, आता या पाचही कोरोनामुक्त रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.


 


महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या रुग्णांचा आकडा २० हजारांच्या पुढे गेला आहे. राज्यात एका दिवसात कोरोनाचे १,१६५ नवे रुग्ण सापडले आहेत, तर २४ तासात ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या २०,२२८ एवढी झाली आहे. तर राज्यात कोरोनामुळे ७७९ जणांना जीव गमवावा लागला आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक ७२२ रुग्ण वाढले आहेत, तर २७ जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला.


मुंबईमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १२,८६४ एवढी आहे, तर आत्तापर्यंत मुंबईत ४८९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या दिवसात कोरोनातुन बरे झाल्यामुळे ३३० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आत्तापर्यंत एकूण ३,८०० रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत.