मुंबई : एसटी महामंडळाने यंदा जाहीर केलेल्या मेगाभरतीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आले असले तरी त्यातील उत्तीर्ण उमेदवारांची संख्या कमी असल्याने एसटीची काहीशी निराशा झालीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसटीमध्ये चालक-कम-कंडक्टर या पदासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या परीक्षेतून आतापर्यंत अंतिम ९०० उमेदवारच महामंडळाच्या हाती लागले आहेत. कंडक्टरविना थेट बससेववर भर देण्याचा मानस असलेल्या एसटी महामंडळाने ७ हजार ९२९ चालक-कम-कंडक्टर पदांसाठी अर्ज मागविले होते. 


एकूण पाच विभागांत पार पडलेल्या परीक्षेत तीन विभागांतून केवळ ९०० उमेदवार उत्तीर्ण झाले असून अन्य दोन विभागांचे निकाल येणे बाकी आहे.  एसटीच्या कर्मचाऱ्यांमध्ये चालक आणि कंडक्टर वर्गातील कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. गेल्या काही वर्षांत एसटीमध्ये मोठ्या प्रमाणात भरती झालेली नाही.