Mumbai Nightlife, मुंबई :  मुंबईकरांना लवकरच म्युझिकल नाईट लाईफची ट्रीट(musical nightlife trea) मिळणार आहे. नव वर्षात मुंबईकरांना शिंदे-फडणवीस  सरकार ही अनोखी भेट देणार आहे. रात्रीच्या प्रकाशात दक्षिण मुंबईतील रस्त्यांवर संगीताचे सूर गुंजणार आहेत. यामुळे रात्रीच्या वेळेस मुंबईची सफर करणाऱ्यांना एक वेगळा अनुभव मिळणार आहे.  मुंबईकरांना संध्याकाळी 7 ते रात्री 1 वाजे पर्यंत ही संगीत मेजवानी अनुभवता येणार आहे.  गिटार, मधुर गाणी, मनोरंजन कार्यक्रमांची रेलचेल मुंबईत पहायला मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण मुंबईतील नरिमन पॉईंट, मरिन लाईन्स, गिरगाव चौपाटी, फॅशन स्ट्रीटवर बँड पार्टी पहायला मिळणार आहे. यामाध्यमातून नवोदित कलाकारांना संधी मिळणार आहे. या म्युझिकल ट्रीटसह  फुड स्टॉल्सही रात्री 1 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. नाईट लाईफला चालना देण्यासाठी सरकार हा अनोखा उपक्रम राबवणार असल्याचे समजते. 


रात्री साऊथ मुंबई संपूर्ण शांत्त होते. फॅशन स्ट्रीट,नरिमन पॉईंट समुद्र किनारा, गिरगाव चौपाटीवर ठिकठिकानी संगीत वाद्य वाजवणारी टीम बसवणार आणि या ठिकाणी खाद्य पदार्थ स्टॉल देखील सुरु असणार.
या उपक्रमामुळे बेरोजगारांना रोजगारची संधी मिळणार आहे. तसेच नवीन कलाकारांना देखील संधी मिळणार आहे.