मुंबईत घरात घुसला अजगर आणि...
एका घरात अजगर शिरल्याची ( python was found in a house ) घटना घडली. या अजगराला मुंबई पोलीस दलात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने पकडला.
मुंबई : घरात शिरलेल्या अजगराला जीवदान देण्यात आले आहे. मुंबईत ( Mumbai) एककीडे थर्टी फस्टचे जोरदार सेलिब्रेशन सुरु असताना धारावीत काल अचानक एका घरात अजगर शिरल्याची ( python was found in a house ) घटना घडली. या अजगराला मुंबई पोलीस दलात काम करणारे मुरलीधर जाधव या शिपाईने अगदी सहजरित्या बाहेर काढले.
घरात घुसलेल्या अजगराला पकडताच लोकांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला. धारावी पोलीस ठाणे हद्दीत वाय जंक्शन येथे एका व्यक्तीच्या घराच्या पहिल्या माळ्यावर सहा फूट लांबीचा अजगर पकडण्यात आला. मुरलीधर जाधव यांनी केलेल्या या कामगिरीमुळे त्यांचे पोलीस दलात कौतुक होत आहे.
पहिल्या मजल्यावर असलेल्या घराच्या कौलात हा सहा फूट लांबीचा अजगर शिरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अजगर आल्याची समजताच मुंबई पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पोलीस दलात काम करणाऱ्या मुरलीधर जाधव या कर्मचाऱ्याने जीवाची बाजी लावत अजगराची सुटका केली. त्यांनी अजगराला घरातून बाहेर काढले.
अजगर घरात शिरल्यामुळे रात्रीच्या वेळी धारावीत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अनेकांनी श्वास रोखला होता. मात्र, ज्यावेळी अजगराला पकडण्यात यश आल्यानंतर उपस्थितांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला. ‘मुंबई पोलीस जिंदाबाद’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
दरम्यान, गतवर्षी मुंबईतील वांद्रे परिसरात दोन अजगर सापडले होते. चौवीस तासांच्या आत या परिसरात तब्बल आठ फुटाचे दोन अजगर सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.