चेतन भगत यांचे अमरनाथ यात्रेविषयी ट्विट, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
अमरनाथ यात्रेवर झालेल्या हल्ल्यानंतर आता सोशल मीडियावर जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे. प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी अमरनाथ यात्रेविषयी केलेल्या ट्विटची सध्या जोरदार चर्चा रंगलीय.
मुंबई : अमरनाथ यात्रेवर झालेल्या हल्ल्यानंतर आता सोशल मीडियावर जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे. प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी अमरनाथ यात्रेविषयी केलेल्या ट्विटची सध्या जोरदार चर्चा रंगलीय.
चेतन भगत यांच्या मते अमरनाथ यात्रेवर हल्ला होण्यामागे प्रवासी हिंदू होते हेच कारणं होतं. भगत यांनी गेल्या आठवड्यात काश्मीरमध्ये झालेल्या मुस्लिम पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येला जर त्याचा धर्म कारणीभूत होता. तर अमरनाथ यात्रेवरच्या हल्ल्याही धर्म कारणीभूत का धरयाचा नाही असं ट्विट केले आहे.