Dombivli Crime News:  डोंबिवलीमध्ये गुन्हेगारीच्या (Dombivli Crime) घटना वाढत असल्याने कायदा व सुव्यवस्थेबबात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मित्राच्या मदतीने एका महिलेने तिच्या लिव्ह इन पार्टनरची हत्या केली आहे. भरदिवसा घडलेल्या या  धक्कादायक घटनेमुळे  डोंबिवलीत खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या महिलेस तिच्या मित्राला अटक केली आहे. यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोंबिवली कोळेगाव परिसरात ही घटना घडली आहे . या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी महिलेसह तिच्या प्रियकराला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.  मारुती हंडे हे संध्या सिंग या महिलेसोबत लिव्ह इन रिलेशशिपमध्ये राहत होता. दोघेही डोंबिवली येथील कोळेगाव परिसरात एकत्र एकाच घरात राहत होते.


मारुतीसह लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत असताना संध्या हिचे गुड्डू शेट्टी नावाच्या व्यक्तीशी मैत्री झाली. मात्र, संध्या आणि गुड्डू याचे प्रेमप्रकरण असल्याचा संशय मारुतीला होता. त्यामुळे या दोघांमध्ये वाद सुरू होते.  शनिवारी दुपारच्या सुमारास संध्या आणि मारुती या दोघांमध्ये वाद झाला. यावेळी गुड्डू देखील घरात उपस्थित होता. गुड्डू आणि संध्या या दोघांनी संतापाच्या भरात मारुती याला बॅटने बेदम मारहाण केली. यामध्ये मारुती याचा जागीच मृत्यू झाला.  घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महिला संध्या व तिचा मित्र गुड्डू शेट्टी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. 


डोंबिवलीत एकतर्फी प्रेमातून विवाहितेवर हल्ला करणाऱ्याला नाशिक मधून अटक


डोंबिवलीत एकतर्फी प्रेमातून विवाहितेवर हल्ला करणाऱ्याला आरोपीला पोलिसांनी नाशिक मधून अटक केली आहे. जिग्नेश जाधव असे अटक आरोपीचे नाव आहे. डोंबिवलीच्या शांतीनगर परिसरात ही घटना घडली होती. पीडित महिला पायी चालत घरी जात असताना एकतर्फी प्रेमातून जिग्नेश जाधव याने या महिलेवर प्राण घातक हल्ला केला होता. 14 एप्रिल रोजी हा प्रकार घडला होता. 


पीडितेला जिग्नेशने रस्त्यात अडवून "मला तु आवडते, मी तुझ्याशी लग्न करेन, तू माझ्या सोबत चल असे म्हणाला. मात्र, पीडितेने त्याला नकार देतात जिग्नेश ने सोबत आणलेला चाकु काढून विवाहितेच्या गळ्यावर सपासप वार केले. या प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात जिग्नेश विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला एक आठवड्यात नाशिक येथून अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या विवाहितेवर कळवा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.