मुलांना झेंडा घेऊन उन्हात उभं केल्याने आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका
भाजपचं सरकारविरोधात आंंदोलन.
मुंबई : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप करत भाजपने राज्यभरात आंदोलन सुरु केलं आहे. यावर मात्र महाविकासआघाडीचे नेते भाजपवर टीका करत आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील एक फोटो शेअर करत भाजपवर टीका केली आहे. सत्तेसाठी भाजपने लहान मुलांना उन्हात उभं केलं. भाजप कोरोना विसरले असून राजकारण प्रिय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
देशात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात आहे. महाविकासआघाडी सत्तेत आल्यानंतर कोरोनाचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर उभं राहिलं. त्यापासून आता राज्याला बाहेर काढण्याचं मोठं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे आहे. राज्यात वाढत जाणारे कोरोना रुग्ण आणि मृत्यू यामुळे विरोधीपक्ष सरकारवर टीका करत आहे. सरकार याबाबतीत अपयशी ठरत असल्याची वांरवांर टीका होत आहे.
भाजप नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन देखील याबाबत तक्रार केली. त्यानंतर राज्यपालांनी अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना बोलवून याबाबत आढावा घेतला. पण या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित नाही राहिले.