मुंबई : शिवसेनेच्या कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत मोठे संघटनात्मक बदल करण्यात येणार आहेत. 


तसंच निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उद्धव ठाकरेंची शिवसेना पक्षप्रमुखपदावर म्हणजे अध्यक्षपदावर फेरनिवड केली जाणार आहे.


मनोहर जोशी, लीलाधर डाके, सुधीर जोशी यांच्यासारखे जेष्ठ नेते यापुढं मार्गदर्शकाच्या भूमिकेत काम करतील. 


तर सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परिषद गटनेते अनिल परब यांना नेतेपदी बढती मिळण्याची शक्यता आहे.


युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यावरही नेतेपदाची जबाबदारी अधिकृतपणे सोपवण्यात येणार असल्याचं समजतंय.