मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या परिक्षा पुढे ढकलण्यात आला. आता या परिक्षा ऑनलाईन घेण्याची तयारी दर्शवली होती. याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी कोरोना काळात परिक्षा न घेण्यासंदर्भातील पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवले आहे. या पत्रात आदित्य ठाकरेंनी परिक्षेच्या विषयात लक्ष घालण्याचे केले आवाहन मोदींना केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना संकटामुळे ऑनलाईन तसेच प्रत्यक्ष उपस्थित राहूनही परिक्षा न घेण्याची विनंती या पत्रातून करण्यात आली आहे. महाराष्ट्रात शैक्षणिक वर्षाची सुरूवात जून २०२० ऐवजी जानेवारी २०२१ पासून सुरू करण्यावर विचार असल्याचे देखील या पत्रात नमूद केले आहे. 



पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वतः ट्विट करून या पत्राची माहिती दिली आहे. आपण सगळेच कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या परिक्षांकडे मला तुमचं लक्ष वेधून घ्यायचं आहे. महामारीच्या या काळात अनेक कोर्सेस परिक्षा घेण्याचा निर्णय घेत आहेत. याबाबत तुम्ही लक्ष द्यावे. तसेच जून महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू होते. पण महामारीच्या या काळात जानेवारी २०२१ पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याची परवानगी द्यावी ही विनंती देखील या पत्रातून करण्यात आली आहे.