Abhishek Ghosalkar Murdered: माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर मॉरेस भाई याचे मुख्यमंत्र्यांसोबतचे फोटो व्हायरल करण्यात आले. यावर शिंदे गटाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. घोसाळकरांच्या हत्येचे समर्थन कोणी केले नाही. मला उबाठा मोठी करायची आहे, असे आरोपीचे बॅनर आहेत. कालच गॅंगवॉर उबाठा गटाचे आहे, असा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटाची बाजू मांडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी नगरसेवक होणार की तू नगरसेवक अशी एकमेकांशी स्पर्धा सुरु होती. आम्ही घोसाळकर कुटुंबीयांच्या दुखात सहभागी आहोत. पण या गोष्टीचे राजकारण कोणी करु नये, असे आवाहन उदय सामंत यांनी केले. याप्रकरणात  मुख्यमंत्री स्वत: लक्ष घालतील. कोणाकोणाला बंदुकीचे परवाने दिले हे तपासले जातील, असे त्यांनी सांगितले. 


क्रिकेट स्पर्धा उद्घाटन, वाढदिवसाच्या जाहिराती सामनात आल्या आहेत. याला मोठ करण्याच काम सामनातून केलं गेलंय. आणि घोसाळकरांच्या सामाजिक कार्याला पाठींबा हा मातोश्रीतून होता. यात एकनाथ शिंदेंना विनाकारण बदनाम करण्यात आल्याचे सामंत यावेळी म्हणाले. मी कोणाला आदर्श मानून भविष्यात काम करणार आहे, याचे मॉरिसचे ट्विट आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 


मुख्यमंत्री जनतेमध्ये जातात. लोकांना भेटतात. काही लोकांना याची सवय नव्हती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अनेक लोक भेटतात. हात जोडतात. असे फोटो टाकून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सामंत म्हणाले. 


महिलांचे प्रश्न, सामाजिक प्रश्न आपण एकत्र येऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून सोडवायचे आहेत, असे फेसबुक लाईव्हमध्ये स्पष्ट आहे. यात शिंदे गटाचा उल्लेख नाही. फेसबुक लाईव्हमध्ये दोघे सामंजस्याची भाषा करत होते.  दोघांनी उबाठा गटात राहायचे ठरवले. त्याआधी कोणासोबत बैठक झाली होती ते तपासले पाहिजे, असेही सामंत म्हणाले.