एसी लोकल सप्टेंबरपासून पश्चिम मार्गावर धावणार
गेल्या वर्षभरापासून नुसतीच चर्चेत राहीलेली एसी लोकल आता प्रत्यक्ष सेवेत दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दिल्ली : गेल्या वर्षभरापासून नुसतीच चर्चेत राहीलेली एसी लोकल आता प्रत्यक्ष सेवेत दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या लोकलच्या चाचण्या सुरू झाल्या आहेत. ही लोकल येत्या सप्टेंबरपासून पश्चिम रेल्वेवरच्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
रेल्वे बोर्डाचे सदस्य रविंद्र गुप्ता यांनी दिल्ली रेल्वे भवन इथे ही माहिती दिली. एसी लोकलचे भाडे अजून ठरवण्यात आलेलं नाही, तसंच या लोकल बरोबरच आणखी ९ एसी लोकल चालवण्यात येणार आहेत, असं गुप्ता म्हणालेत.
पनवेल सीएसटी कॉरिडॉरसाठी परवानग्या मिळणं बाकी असून राज्य सरकारसोबत यासाठी लवकरच करार होणार आहे. तर मुंबई अहमदबाद बुलेट ट्रेनही २०२२ मध्ये सुरू होणार असल्याची माहिती गुप्ता यांनी दिली आहे.