मुंबई:  मुंबई अहमदाबाद हायवे वर घोडबंदर येथे गॅस टॅंकर उलटला. सुदैवाने या अपघातामध्ये गॅस लीक होत नसल्याने मोठे संकट टळले आहे. मात्र रस्ता सुरक्षितपणे मोकळा करण्यासाठी उरणहून रेस्क्यु टीम रवाना करण्यात आली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपघातानंतर ठाण्यातील नागला रोडपासून मुंबईकडे येणारी वाहतुक बंद करण्यात आली आहे. तसेच वाहनं वळवून मुलुंड किंवा भिवंडी मार्गे आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रस्ता मोकळा होण्यासाठी अजून 3-4 तास लागण्याची शक्यता आहे. दरम्यान घटनास्थळी मोबाईल वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच वाहनं चालवण्यास मनाई करण्यात आली आहे. अन्यथा मोठा ब्लास्ट होण्याची शक्यता आहे.