मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; ३० जखमी
७ जण गंभीर जखमी
मुंबई : मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. कंटेनर आणि दोन बसेसची जोरदार धडक झाली. या धडकेत ३० प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
माणगावजवळ ढालघर फाटा इथे हा अपघात झाला. अपघातात ७ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने मुंबईतील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. उर्वरीत जखमींवर माणगाव उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र कंटेनर आणि बसेसचे यात मोठे नुकसान झाले आहे.