झी २४ तासचा दणका : अवैध `पे अॅन्ड पार्क`चा धंदा बंद
बातमी `झी २४ तास`च्या दणक्याची... उच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून उड्डाण पुलाखालचा `पे अॅन्ड पार्क`चा अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आलीय.
मुंबई : बातमी 'झी २४ तास'च्या दणक्याची... उच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून उड्डाण पुलाखालचा 'पे अॅन्ड पार्क'चा अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आलीय.
अवैध 'पे अॅन्ड पार्क'चा धंदा सुरू असल्याचं 'झी २४ तास'नं दाखवल्यावर यंत्रणेची एकच दाणादाण उडाली. काल दुपारपासून अवैध पार्किंग थांबवण्यात आलंय.
त्यामुळे आता ह्या ठिकाण सुशोभीकारण करून जॉगिंग ट्रेक बनवण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे.