मुंबई : 'शेतकऱ्यांनी आता आत्मनिर्भर व्हावं', असं म्हणत अनुपम खेर यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. लोकसभेत शेतीशी निगडीत तीन महत्वाचे विधेयक मंजुर करण्यात आले. याला समर्थन देत अभिनेता अनुपम खेर यांनी ही व्हिडिओ शेअर केला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या विधेयकांना हरियाणा आणि पंजाबमध्ये जबरदस्त विरोध करण्यात आला आहे. विरोधकांचा असा आरोप   आहे की, सरकार बाजार समित्या रद्द करण्याच्या तयारीत आहे. असं केलं तर देशातील खाद्य सुरक्षा संपून जाईल. 


समर्थन करताना अनुपम खेर यांनी आपल्या सिनेमाचा दाखला दिला आहे.  अनुपम खेर यांनी '१९९०' च्या सिनेमाचं उदाहरण दिलं आहे. ते म्हणतात, मी ९० च्या दशकात 'जीने दो; नावाचा एक सिनेमा केला होता. त्यामध्ये मी एका गरीब शेतकऱ्याची भूमिका साकारली होती. राजेश सेठी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. ही त्या शेतकऱ्याची गोष्ट होती जो शेती करुन पिकवलेलं धान्य बाजारात घेऊन जातो. 



त्याला तिथे एक दलाल भेटतो जो त्याच्या हिशोबाने त्या धान्याचे दर ठरवतो. त्याचवेळी तिथे जमीनदार म्हणजे अभिनेता अमरिश पुरी येतात. ते सांगतात मी या धान्याचा भाव ठरवतो हे सगळं धान्य माझ्या कोठारात जमा करा. त्याप्रमाणे शेतकरी ते सगळं धान्य जमीनदाराच्या धान्य कोठारात जमा करतो. जे धान्य या शेतकऱ्याने १५० रुपयांमध्ये विकलं होतं ते रेशनच्या दुकानात २५० रुपयांनी मिळतंय हे त्या शेतकऱ्याला समजतं. तो उद्विग्न होतो. मला यातून इतकंच सांगायचं आहे की शेतकऱ्यांची अवस्था ही त्यावेळीही वाईट होती.