Aroh Welankar On Bjp Advertisement: 9 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीने 'आता येणार, मोदी सरकार' नावाने जाहिरात कॅम्पेन चालविले होते. यामध्ये तरुण नोकऱ्यांबद्दल चिंता व्यक्त करत होते. आता पुन्हा 9 वर्षाच्या कालावधीनंतर या जाहिराती पुन्हा रिट्विट केल्या जात आहेत. हे तरुण सध्या काय करतायत? असा प्रश्न विचारला जात आहे. यावरुन आधीचे ट्विटर म्हणजेच एक्स वर तूतू मै मै पाहायला मिळत आहे. असाच एक प्रसंग मराठी अभिनेता आरोह वेलणकर याच्यासोबत घडला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता आरोह वेलणकरने 9 वर्षांपुर्वी भाजपच्या जाहिरातीत काम केले होते. ही जाहिरात न मिळालेल्या नोकऱ्यांसंदर्भात होती. 'आई वडिलांनी मला शिकवलं. दिवसरात्र अभ्यास करुन मी पदवी मिळवली. पदवी मिळाली पण नोकरी नाही. आर्थिक आघाडीवर बट्ट्याबोळ करणारे आम्हाला नोकरी कुठून देणार? वा रे वा माझ्या देशाचे सरकार.. या सरकारची 10 वर्षे गेली स्वत:चीच नोकरी वाचवण्यात..या सरकारमध्ये असच चालतं.. तरुणांना नोकरी नाकारणाऱ्यांनो, जनता माफ करणार नाही.', असे आरोह या जाहिरातीत म्हणताना दिसत आहे. 


ही जाहिरात एका एक्स युजरने पुन्हा शेअर केली.  भाजपची जाहिरात करणारा हा 9 वर्षात लाखोंचा जॉब करत असेल, नाही का? असा प्रश्न त्याने विचारला. त्यानंतर सोशल मीडियात आपली परखड मते मांडणारा आरोह वेलणकरने त्याला उत्तर दिले. 



'मोदीजींनाच सपोर्ट करणार'


हो मीच आहे, आणि ह्यावेळेस पण भाजप आणि मोदीजींनाच सपोर्ट करणार, असे आरोहने सांगितले. काय पी पाटील समजलं का? माझ्या जॉब आणि पैश्याचं सोड तुला जॉब हवा असेल तर सांग पगारावर घेऊ शकतो, मागच्या ९ वर्षात मोदीजींनमुळे छान झालं सगळं....बोल किती देऊ पगार तुला? असा प्रश्न त्याने संबंधित तरुणाला विचारला. 9 वर्षा पुर्वी केलेल्या भाजपच्या जाहिरातीवरून एवढी मळमळ होतीये चमच्यांना, काल राममंदिरावर केलेला अख्खा व्हिडीओ येईल तेव्हा काय होईल? चमच्यांनो तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला शक्य नाही रे काही. तुम्ही, तुमच्या बॉसनी संन्यास घ्या आता. घरी बसा, अशा शब्दात आरोहनी त्याला प्रत्युत्तर दिले. 


आरोहचे पुन्हा ट्विट


या प्रकरणाला 2 दिवस झाल्यानंतर आरोहने पुन्हा संबंधित तरुणांना डिवचले आहे. मी " वैफल्यग्रस्त सांगाडे pvt ltd" नावाची कंपनी काही उमदा, हरहुन्नरी आणि क्रिएटिव गरजू तरुणांच्या नावानी रेजिस्टर करतोय आणि त्यांना अर्पण करतोय. ३ सीव्ही शॉर्टलिस्ट केले आहेत. चला डिटेल्स पाठवा असे ट्वीट आरोहने केले आहे. एक्स युजर्स यावर कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.