मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर पोहचली आहे. ज्याप्रकारे बीएमसीने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली होती, त्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यपालांनीही कंगनाच्या कार्यालयावर ज्याप्रकारे कारवाई करण्यात आली होती, त्याबाबत नाराजी व्यक्त केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांना राज्यपालांनी राजभवनवर बोलवून घेतलं होतं. राज्यपालांनी अजोय मेहता यांच्याशी कंगना रानौत हिच्या घरावर झालेली कारवाई आणि या प्रकरणी सरकारची भूमिका याबाबत झाली चर्चा केली. या प्रकरणात सरकारने घेतलेल्या भूमिकेबद्दल राज्यपालांनी अजोय मेहता यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. कंगना वादात राज्यपालांनीही, राज्यसरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. 


कंगना राणौतने मुंबईची तुलना पाकिस्तान-पीओकेशी केल्यानंतर विविध माध्यमातून तिच्यावर टीका होत आहे. कंगना राणौतच्या मुंबईमध्ये येण्याला शिवसैनिकांनी विरोध केला आहे. तर दुसरीकडे आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी मात्र कंगनाला पाठिंबा दिला आहे.  


मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली. कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम दाखवत पालिकेने त्यावर हातोडा चालवला. त्यानंतर आता कोर्टाने परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले असून कंगनाच्या याचिकेवर २२ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. अल्पावधीची नोटीस देत कारवाई करणं पक्षपाती आणि चुकीचं असल्याचा आरोप कंगनानं म्हंटलंय.