मुंबई : शिवसैनिकांचा मुंबईत जाहीर मेळावा होत आहे. मुंबईतल्या मरिन लाइन्स येथील मातोश्री सभागृहात मेळावा होतोय. 'साहेब आम्ही तुमच्या सोबत आज उद्या आणि सदैव' अशी आजच्या मेळाव्याची टॅगलाईन होती. यावेळी बोलताना युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना इशारा दिला आहे. (Aaditya Thackeray warn to Rebel MLA)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबई एअरपोर्टवर उतराल तेव्हा लक्षात ठेवा. विधानभवनाकडे जाणारे रस्ते वरळी, वांद्रे, परळ, भायखळ्यातून जातात हे त्यांनी लक्षात ठेवावे. केंद्राने आर्मी लावावी किंवा CRPF. असा इशारा आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दिला आहे.


'आपल्याच लोकांनी दगाफटका केला. यामुळे अनेक लोकांच्या डोळ्यात अश्रू पाहिलेत. मुख्यमंत्र्यांचा सारखा दुसरा कोणी होवू शकत नाही. हे जगातलं पहिलं उदाहरण आहे, की सत्ताधारी पक्षातून विरोधी पक्षाकडे गेलेत. लोकं विरोधातून सत्तेत येतात.'


'ज्याला जायचं त्यानं जा, पुन्हा यांना शिवसेनेत स्थान नाही. राजीनामे द्या आणि या निवडणूकीत उतरा आम्ही तयार आहोत. या रणरागीण्या तुम्हाला प्रचाराला तरी उतरू देतात का पाहा. आपलेच लोक फुटीरवादी आहेत. पण आज या आमदारांना गुहाटीत कैद्यांसारख वागवतायत.'


'आधीचे बंड आपण मोडून काढले, ती लोकं आता दिसतपण नाहीत. या पळून गेलेल्यांना कायमचं पळवून लावायचंय. जेव्हा जेव्हा मी अयोध्येला गेलोय पक्षासाठी चांगलंच झालंय. हे कदाचित त्यासाठीच झालंय. आता तरूणांना संधी मिळेल.' असं ही ते म्हणाले.