दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारात आदित्य ठाकरे यांची वर्णी लागली आहे. आदित्य ठाकरेंना राज्यमंत्री की कॅबिनेट मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. मात्र आता आदित्य ठाकरेंना कॅबिनेटमंत्रिपद मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बराच काळ लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी या शपथविधी सोहळ्यामध्ये मंत्र्यांना शपथ देतील. 


दुपारी एक वाजल्यापासून विधानभवनाच्या समोर असणाऱ्या प्रांगणात हा मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहा मंत्र्यांनी २८ नोव्हेंबरला शपथ घेतली होती. त्यानंतर महिनाभरापासून सात मंत्रीच राज्याचा कारभार पाहत आहेत. महाविकासआघाडीचा विस्तार लांबल्यामुळे विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका केली जात होती.