आदित्य ठाकरे यांच्या कारला धडक देणं पडलं महागात, तरुणावर गुन्हा दाखल होणार
Aditya Thackerays Car Hit: युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या कारला बाईकस्वाराने धडक दिल्याचा प्रकार समोर आला होता. पण आदित्य ठाकरेंच्या कारला धडक देणं तरुणाला महागात पडणार आहे. कारण या तरुणावर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अमित वंजारा असे या बाईकस्वाराचे नाव आहे. आदित्य ठाकरेंच्या कारला धडक दिल्याप्रकरणी अमितवर रॅश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल होणार आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल होणार आहे.
काही दिवसांपुर्वीच ठाकरे परिवाराच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती. दरम्यान आज युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आदित्य ठाकरे यांची गाडी आज शिवसेना भवन येथे येत असताना हा प्रकार घडला. आदित्य ठाकरेंच्या गाडीच्या मागून आलेला बाईक स्वार त्यांच्या गाडीला येऊन धडकला.
शिवसेना भवन येथील सिग्नलच्या पुढे येऊन आदित्य ठाकरे शिवसेना भवन येथे उजव्या बाजूला वळण घेत होते. तेव्हा अचानक वेगाने बाईकस्वार पुढच्या चाकाजवळ धडक दिली. सुदैवाने यात कोणती हानी झाली नाही.
दरम्यान, काही वेळात आदित्य ठाकरे शिवसेना भवन येथे पोहोचले. यावेळी त्यांनी शाखाप्रमुखांना त्या बाईकस्वाराची विचारपूस करायला सांगितले. आदित्य ठाकरे यांची सुरक्षा कमी करण्यात आल्यानंतर ही घटना घडल्याने सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने ठाकरे परिवाराच्या सुरक्षेत कपात केली होती. त्यावर राज्यभरातील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून संतप्त प्रतिक्रिया आल्या होत्या.