Aditya Thackerays Car: काही दिवसांपुर्वीच ठाकरे परिवाराच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती. दरम्यान आज युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आदित्य ठाकरे यांची कार आज शिवसेना भवन येथे येत असताना हा प्रकार घडला. आदित्य ठाकरेंच्या गाडीच्या मागून आलेला बाईक स्वार त्यांच्या गाडीला येऊन धडकला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना भवन येथील सिग्नलच्या पुढे येऊन आदित्य ठाकरे शिवसेना भवन येथे उजव्या बाजूला वळण घेत होते. तेव्हा अचानक वेगाने बाईकस्वार पुढच्या चाकाजवळ धडक दिली. सुदैवाने यात कोणती हानी झाली नाही.


दरम्यान, काही वेळात आदित्य ठाकरे शिवसेना भवन येथे पोहोचले. यावेळी त्यांनी शाखाप्रमुखांना त्या बाईकस्वाराची विचारपूस करायला सांगितले. आदित्य ठाकरे यांची सुरक्षा कमी करण्यात आल्यानंतर ही घटना घडल्याने सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे


राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने ठाकरे परिवाराच्या सुरक्षेत कपात केली होती. त्यावर राज्यभरातील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून संतप्त प्रतिक्रिया आल्या होत्या.