मुंबई : सायनमध्ये गांधी मार्केटसमोर पावसाच्या पाण्यात अडकलेल्या गाडीत गुदमरून वकिलाचा मृत्यू झाल्याचं समोर येतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी धो - धो कोसळणाऱ्या पावसानं मुंबईला चांगलंच झोडपून काढलं... यामुळे रस्त्यांवर साचलेल्या पाण्यांत अनेक गाड्या बंद पडल्या होत्या. सायन भागातील गांधी मार्केटजवळ एक इसम आपल्या गाडीत बेशुद्ध अवस्थेत पोलिसांना आढळला. 


जवळपास अडीच - तीन तास ही व्यक्ती गाडीमध्ये त्याच अवस्थेत होती. पोलिसांना या घटनेची माहिती समजल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली... पोलिसांनी या इसमाला जवळच्याच सायन रुग्णालयात दाखल केलं... परंतु, रात्री ९.३० च्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. 


मृताचं नाव प्रियेन असल्याचं समजतंय... ३० वर्षीय प्रियेन वकील असल्याचं समोर येतंय.