नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये आफ्रीकन आंबा दाखल; कोकणातील हापूसला टक्कर
आफ्रिकेतील मलावी या ठिकाणावरून मुंबईतील एपीएमसी फळबाजारात मोठ्या प्रमाणावर येथील आंब्याची आवक सुरू झाला आहे. महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये या मलावी आंब्याला मोठी मागणी आहे.
स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : खवय्ये नेहमीच कोकणातील हापूस आंब्याचा आतुरतेने वाट पाहत असतात. आंबे खवय्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. थेट आक्रिकन आंबा(African Mango) नवी मुंबईच्या(Navi Mumbai) APMC मार्केटमध्ये (APMC Market) दाखल जाला आहे. हा आफ्रीकन आंबा कोकणातील हापूस आंब्याला(Hapus Mango from Konkan) टक्कर देणार आहे.
आफ्रिकेतील मलावी या ठिकाणावरून मुंबईतील एपीएमसी फळबाजारात मोठ्या प्रमाणावर येथील आंब्याची आवक सुरू झाला आहे. महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये या मलावी आंब्याला मोठी मागणी आहे. मागील पाच वर्षांपासून मलावी आंब्याची आवक भारतात होत आहे. पंधरा वर्षांपूर्वी कोकणातील हापूस आब्यांच्या झाडांची कलम आफ्रिकन देश मलावी मध्ये घेऊन जाऊन साडेचारशे एकर वर आंब्याची लागवड करण्यात आली.
या आफ्रिकन आंब्याची चव कोकणातील हापूस आंब्याप्रमाणेच असल्याने या आंब्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मलावी आंब्याच्या तीन किलोच्या एका बॉक्सची किंमत सध्या तीन हजार रुपये ते पाच हजारां पर्यंत आहे. आज 800 बॉक्सची आवक एपीएमसी बाजारात झाली आहे.
यंदा खवय्यांना लवकरच हापूसची चव चाखालयला मिळणार आहे. दोन दिवसांपूर्वीच देवगड येथील हापूसच्या दोन पेट्या मार्केटमध्ये दाखल झाल्या आहेत.