#TigerIsBack #SanjayRaut संजय राऊत यांना जामीन मिळताच सोशल मीडियावर धुरळा, ट्विटरवर ट्रेंडिग
`कोण आला रे कोण आला` सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस, संजय राऊत सोशल मीडियावर Trend
Sanjay Raut Bail : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (PatraChawal Scam) तब्बल 102 दिवस जेलमध्ये असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अखेर आज जामीन मिळाला. पीएमएलए कोर्टाने (PMLA Court) 2 लाखांच्या रोख रकमेवर संजय राऊत यांना जामीन मंजूर केला. यानंतर ठाकरे गटाकडून (Thackeray Group) राज्यभर जल्लोष केला जात आहे. Tiger is Back, 'कोण आला रे कोण आला', शिवसेनेचा ढाण्या वाघ बाहेर येणार अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी संजय राऊत यांच्या सुटकेवर आनंद व्यक्त केला आहे.
सोशल मीडियावर संजय राऊत ट्रेंड
इतकंच काय तर सोशल मीडियावर संजय राऊत ट्रेंड सुरु आहे. संजय राऊत यांचे भाऊ सुनिल राऊत यांनी ट्विट यांनी संजय राऊत यांचा एक व्हिडिओ ट्विट केला असून त्यावर सत्य परेशान हो सकता है पराजित नाही, असं म्हटलं आहे. तसंच #TigerIsBack #SanjayRaut असे हॅशटॅगही दिले आहेत.
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी तर थेट इशाराच दिला आहे. माननीय न्यायालयाने खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाचे मनःपूर्वक आभार. विरोधकांनी आता आपल्या राजकीय सतरंज्या संभाळाव्यात. आणि हो, कोंबड्यांनी आपली पिल्ले घेऊन आता खुराड्यात जाण्याची वेळ आली आहे, असं दानवे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
एका युझरने अब आयेगा मझा, फायनली टायगर इज बॅक असं म्हणत संजय राऊत यांचा हातात बॅट घेतलेला फोटो ट्विट केला आहे.
एका युझरने भाजपाला इशारा देणारं ट्विट केलं आहे. वह झुका नही, ऑल द बेस्ट BJP, असं ट्विट केलं आहे.
मविआ नेत्यांच्या प्रतिक्रिया
संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर मविआ नेत्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. संजय राऊत यांच्यावर दबावतंत्र वापरलं पण त्यांनी गद्दारी केली नाही, ते पळून गेले नाहीत, संजय राऊत निष्ठावंत शिवसैनिक आहेत अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. तर शेर वापस आया है, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे. शिवसैनिकांमध्ये आज हजार हत्तीचं बळ संचारलं आहे, आम्हाला संजय राऊत यांचा अभिमान असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.