मुंबई : सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देऊ केलं आहे. पण ५२ टक्के ओबीसींना आजही पुरेसं आरक्षण दिलं गेलेलं नाही. त्यामुळे सरकारला विरोध दर्शवण्यासाठी ओबीसी संघर्ष समन्वय समितीकडून आज आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील सर्व ओबीसी संघटना सहभागी होणार आहेत. २७ टक्के आरक्षण १९ टक्क्यांवर आणलं आहे.


मर्यादा वाढवा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 जातीनिहाय जनगणना न करता मराठा समाजाला एकतर्फी १६ टक्के आरक्षण ही ओबीसींची फसवणूक असल्याची भूमिका ओबीसी संघटनांनी घेतलीय. जातीनिहाय जनगणना करून त्यानंतर आरक्षण द्यावे, आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशी भूमिका ओबीसी संघटनांनी घेतलीय.


विधेयक आजच विधानसभेत  


 मराठा आरक्षण विधेयक आजच विधानसभेत मांडलं जाणार आहे. आज दुपारी १२ वाजता कृती अहवाल मांडला जाईल. त्यानंतर तासाभरात आरक्षणाचं विधेयक सभागृहात मांडलं जाईल. आज सकाळी 10.30 वाजता मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक होईल, त्यात उरलेल्या गोष्टी अंतिम केलेला जातील.


विधानसभेच्या कार्यक्रम पत्रिकेत सरकारतर्फे कृती अहवाल मांडणार असल्याचा उल्लेख आहे. मात्र विधेयकाचा उल्लेख केला नव्हता.


त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता विधेयक आजच सभागृहात मांडलं जाणार असल्याचं विनोद तावडे यांनी स्पष्ट केलंय.