मुंबई : महाराष्ट्रातील लाऊडस्पीकर आणि हनुमान चालिसा वादात अडकलेले सर्वच राजकीय पक्ष आता अयोध्येकडे धाव घेताना दिसत आहेत. 5 जूनला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackarey ) अयोध्येला ( Ayodhya ) जात आहेत, त्यानंतर बातमी आली की महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackarey )  यांचे पुत्र आदित्य ठाकरे ( Aaditya Thackraey ) हे 10 जूनला राम नगरी अयोध्येत पोहोचत आहेत. मात्र, आता काँग्रेसही अयोध्येला जाण्याच्या शर्यतीत उतरली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्याचे पर्यावरण मंत्री युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ( Aadity Thackarey ) यांनी आपले अयोध्या दौऱ्याचे कार्यक्रम यापूर्वीच जाहीर केले आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी कोणताही गाजावाजा न करता अयोध्येला जाऊन श्री रामाचे दर्शन घेतले.


मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यापाठोपाठ आता  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) हे देखील लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. अयोध्येतील दशरथ गद्दीचे महंत ब्रिजमोहन दास यांनी नाना पटोले यांना अयोध्येत येण्याचे निमंत्रण दिले आहे. 


महंत ब्रिजमोहन दास यांनी महाराष्ट्र काँग्रेस कार्यालयात जाऊन नाना पटोले यांची आज भेट घेतली. मात्र, नाना पटोले अयोध्या दौऱ्यावर कधी जाणार आहेत हे निश्चित झालेले नाही.



शिवसेनेकडून हिंदुत्वाचा मुद्दा हायजॅक करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रयत्न करत आहेत. पण, इतर पक्षांनाही हीच भीती वाटत आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षाला हिंदुत्वासोबत नाही तर विरोधातही भूमिका घ्यायची नाही. त्यामुळेच हनुमान चालिसा वादानंतर राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मार्गावर जी भूमिका घेतली आहे. त्याची भरपाई करण्यासाठी महाराष्ट्रातील इतर पक्ष ही शर्यतीत आले आहेत.